मराठी जैन साहित्य
प्राचीन काळापासून जैन साहित्याची समृद्ध परंपरा भारतीय भाषेस लाभलेली आहे. पाली, अर्धमागधी, पैशाची आणि महाराष्ट्री या प्राकृत भाषांमध्ये जैन साहित्याचे लेखन अधिक भरघोसपणे झालेले आहे, मराठीच्या भाषेच्या निर्मितीत या सर्व प्राकृत भाषांचे योगदान महत्वाचे मानले जाते. 'महाराष्ट्री ते मराठी' असा मराठी भाषेच्या उत्पत्तीचा सिद्धान्त मानला जातो. जैन लेखकांनी सर्वाधिक महाराष्ट्री भाषेत ग्रन्थरचना केलेली दिसते. या जैन ग्रंथांनी मराठीच्या आजच्या विकासखुणा मध्ययुगातच अधिक भरभक्कम केलेल्या होत्या. मराठीच्या भाषेचा जन्मापासूनचा जैन साहित्याचा प्रवास पाहिला तर जैन साहित्याची कामगिरी मोलाची असल्याचे आपल्या प्रत्ययास येते. मराठीचे अभिजातपण सिद्ध करण्यास महाराष्ट्रीतील व मराठीतील जैन ग्रन्थ हे मूलाधार ठरतात. त्यामुळे मराठीचा इतिहास जैन साहित्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. असे असले तरी या जैन साहित्य परंपरेकडे मराठीतील संशोधकांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.
आधुनिक काळातही मध्यवर्ती मराठी साहित्यधारेला समांतर अशी जैन साहित्याची परंपरा दिसून येते. 1850 ते 2000 या आधुनिक कालखंडातील जैन तत्त्वज्ञान, धर्म आणि आचारपरंपरेचा गाभा असलेल्या जैन साहित्याची नोद या ग्रंथात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ मराठी संशोधकांना व मराठी भाषेच्या इतिहासाची पुनर्मांडणी करणाचांना दिशादर्शक ठरणारा आहे.
-राजन गवस
Log In To Add/edit Rating
You Have To Buy The Product To Give A Review